भुसावळात खाजगी क्लासबाहेरून दुचाकी लांबवली
भुसावळ : शहरात दुचाकी चोरीचे सत्र थांबायला तयार नसल्याने वाहनधारक धास्तावले आहे. शहरातील सेंट अलॉयसीस शाळेच्या पाठीमागील करीयर क्लासेसबाहेरून चोरट्यांनी 32 हजार रुपये किंमतीची अॅक्टीव्हा दुचाकी लांबवली. चोरीचा प्रकार शनिवार, 18 रोजी सकाळी आठ ते दुपारी चार दरम्यान घडला. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आशुतोष गिरीश माळी (22, गडकरी नगर, रिंग रोड, भुसावळ) हा विद्यार्थी करीयर पॉईंट या खाजगी क्लासमध्ये शिक्षण घेतो व क्लासमध्ये जाण्यासाठी तो अॅक्टीव्हा दुचाकी (एम.एच.19 सी.ई.4720) चा वापर करीत होता मात्र शनिवारी दिवसभरात क्लासबाहेरून चोरट्यांनी दुचाकी लांबवली. तपास हवालदार संजय सोनवणे करीत आहेत.
