यावलमध्ये तृतीय पंथीयाकडून रोकड लांबवण्याचा प्रयत्न
यावल : यावल बसस्थानकाच्या आवारात शनिवारी सकाळच्या सुमारास काही मद्यप्राशन केलेल्या तृतीयपंथीयांनी एका महिलेच्या हातातून पैसे लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र नागरीकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहरातील एस.टी.बस स्थानकावर काही तीन ते चार तृतीयपंथी महिलांकडून बळजबरीने पैशांची वसुली करीत असतानाच एकाने महिलेच्या हातातील सर्व पैसे रक्कम लांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतन नागरीकांनी त्या तृतीयपंथीयास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या चौकशीत संबंधित हे तृतीयपंथीय नकली असल्याची माहिती असून ते जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील राहणार असल्याचे समजते. मद्यप्राशन करून नकली तृतीयपंथीयांकडून प्रवाशांना मनस्ताप होत असल्याने पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
