एणगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी पुरूषोत्तम गड्डम
शालेय प्रगतीचा आलेख उंचावणार : पी.एस.गड्डम यांची ग्वाही
बोदवड : मॅट्रीकपर्यंत ज्या शाळेत विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले, त्याच शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पुरूषोत्तम गड्डम यांनी पदभार स्विकारला असून विद्यार्थी ते मुख्याध्यापक हा त्यांचा प्रवास अभिमानास्पद व उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन एन.डी.बोंडे यांनी केले. एणगाव जी.डी.ढाके हायस्कुलच्या मुख्याध्यापक पदावर पुरुषोत्तम गड्डम यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात पदग्रहण समारंभ झाला. त्यावेळी चेअरमन बोंडे बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन रामचंद्र गोविंदा पाटील, सचिव सुरेश रामचंद्र किनगे, माजी चेअरमन सुपडूसिंग प्रतापसिंग पाटील, डॉ.विष्णु शंकर वराडे, श्रीकृष्ण उखा पाटील, पुरूषोत्तम तळेले, बोदवड तालुका भाजपाध्यक्ष विनोद कोळी, जी.जी.जावळे, पी.एस.बोंडे, एन.आर.राजपूत, एस.व्ही.वराडे, यु.बी.पाटील, एस.ए.पाटील, एम.पी.कोळी, व्ही.एन.दांडगे, एस.टी.पावरा, आर.के.भंगाळे, वाय.एस.निकम, निलेश बोंडे, हेमंत पाटील तथा विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.



समन्वय साधणार -पी.एस.गड्डम
विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर बांधव, संचालक मंडळ आणि शिक्षण विभाग प्रशासन या सर्वांमध्ये योग्य समन्वय साधत, शालेय प्रगतीचा आलेख उंचावणार असल्याची भावना नवनियुक्त मुख्याध्यापक पी.एस.गड्डम यांनी बोलून दाखवली. 1988 ला ज्या शाळेतून एस.एस.सी.उत्तीर्ण झालो होतो, त्या शाळेचा आज मुख्याध्यापक म्हणून पदभार स्विकारतांना आनंद होत आहे मात्र जबाबदारीची जाणीव सुध्दा आहे, असेही गड्डम म्हणाले. यशस्वीतेसाठी अशोक तायडे, सुरेश शिरसाठ, सुधाकर पाटील व कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
