रावेर तालुक्यातील चार हजार 579 शेतकर्‍यांची यादी प्राप्त


रावेर : महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी रावेर तालुक्यातील चारहजार 579 लाभार्थांची यादी प्राप्त झालेली आहे. या सर्व याद्या संबधीत गावच्या तलाठी चावडीवर प्रसिद्ध करण्यात येणार असून पात्र शेतकर्‍यांनी आधार प्रणालीकरण करण्याचे आवाहन उषाराणी देवगुणे यांनी केले आहे. महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत रावेर तालुक्यात चार हजार 579 शेतकर्‍यांच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. यात अपात्र 293 शेतकर्‍यांपैकी आधार प्रमामीकरण झालेले 172 लाभार्थी आहे. आता ग्रामपंचायत निवडणूकीमुळे प्रसिध्दी न केलेल्या नऊ गावातील 436 शेतकर्‍यांची निवडणूक असल्याने ग्रामपंचायतीच्या सिमेलगतचे गावे आंदलवाडी, दसनुर, मस्कावद बु.॥, सावदा, सुनोदा, वाघोदा बु.॥ वाघोदा खु.॥, उदळी, थोरगव्हाण अशी नऊ गावे वगळुन उर्वरीत गावामध्ये शेतकर्‍यांच्या याद्या यादया या ग्रामपंचायत, तलाठी यांच्या चावडीवर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 172 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. उर्वरीत यादीमधील शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये जावुन एमजेपीएसकेवाय या पोर्टलवर आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे जेणेकरून शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देणे सोईस्कर होईल, असे महसूल विभागातर्फे कळवण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !