रावसाहेब दानवे स्पष्टच म्हणाले : कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले मात्र राजकीय वातावरण बदलल्याने बसला फटका


जालना : लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला असून त्यावरून आता मंथन सुरू आहे. रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांनी निवडणुकीत परिश्रम घेतल्याचे सांगत वातावरण बदलल्याचा पक्षाला फटका बसल्याचे सांगितले. दानवे म्हणाले की, माझ्या मुलाच्या विधानसभा मतदारसंघात देखील मला कमी मताधिक्य मिळालं. मग त्यात माझ्या मुलाने माझ्या विरोधक काम केलं असं म्हणू का? त्यामुळे कुणालाही दोष देता येणार नाही. एकूणच राज्यात राजकीय वातावरणात बदल झाला आहे, त्याचा फटका पक्षाला बसला. निवडणुकीत पराभवाची वेगवेगळी कारणे असतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच आम्ही कष्ट करून बाजी मारू.

मतदारसंघात मंथन दौरा करणार
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रावसाहेब दानवे सध्या मतदारसंघात मंथन- आभार दौरा करत आहेत. स्थानिकांशी ते संवाद साधत आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्यें भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. कार्यकर्ते खचून गेल्याचा दिसलं. त्यामुळं कार्यकर्त्यांना या अपयाशातून बाहेर काढण्यासाठी मी आता मतदारसंघाचा दौरा सुरू आहे. 13 जूनला अंबड, पैठण आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व विधानसभेचा दौरा करणार आहे. आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी आता सर्कल वाईज बैठका देखील घेणार आहे, असं यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !