विधवा महिलेशी विवाह करीत त्यांनी निर्माण केला आदर्श


फैजपूरात सुतार समाजातील आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक f: दोघा मुलांचे पालकत्वही स्वीकारले

फैजपूर : लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असा समज असला तरी आजच्या विज्ञान युगात काही जण आपापल्या परीने समाजासमोर आदर्श घडवित असतात. अशाच एका उच्चशिक्षित तरुणाने अकाली आलेल्या वैधव्यामुळे दोन मुलांसह जीवन कंठीत करणार्‍या महिलेशी विवाह करीत सुतार समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे या विवाहाला सुतार समाज बांधवांनी मोठी गर्दी केली. लग्नसोहळा सर्वांच्या साक्षीने नुकताच पडला.

सुतार समाजापुढे उभा केला आदर्श
मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर जवळील खकनार येथील कविता हिचा विवाह फैजपूर येथील किशोर निंबाळे मिस्त्री यांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा नगरसेवक अमोल निंबाळे यांचा भाऊ स्वप्निल यांच्याशी आठ वर्षापूर्वी झाला होता. सुखाने संसार सुरू असताना स्वप्निलचा मार्च 2018 मध्ये वाहन अपघातात मृत्यू झाल्याने निंबाळे परीवारावर मोठे संकट कोसळले होते. स्वप्निलच्या मवाळ स्वभावामुळे तो फैजपूरसह परीसरात सर्वांना परीचित होता. त्याच्या या अकाली मृत्यूमुळे परीसरात दुःख व्यक्त करण्यात आले होते. स्व.स्वप्निल यांचा आतेभाऊ चंद्रकांत उर्फ पप्पू जाधव या उच्चशिक्षित तरुणाने निंबाळे परीवाराला धीर देत कविताच्या मुलगा व व मुलीचा स्वीकार करीत लग्नाचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला सुतार समाजातील प्रतिष्ठित मंडळींनी एकत्र येऊन होकार देत पुनर्विवाहाला संमती दिली. कविता व चंद्रकांत ऊर्फ पप्पू यांचा विवाह 27 फेब्रुवारी रोजी साध्या पध्दतीने मात्र भाऊबंद, नातेवाईक, आप्तेष्ट तथा मित्रमंडळीच्या उपस्थित पार पडला. उच्चशिक्षित तरुण चंद्रकांत (पप्पू) जाधव व परीवाराचे संत-महंत, लोकप्रतिनिधी व समाजातील मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !