कोयना एक्स्प्रेसखाली सापडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू


कोल्हापूर : कोयना एक्स्प्रेसखाली सापडून दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेमध्ये दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत आता शाहूपुरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मृतांची ओळख अस्पष्ट
मुंबईतून कोल्हापूरच्या दिशेने येणार्‍या कोयना एक्स्प्रेसखाली आल्याने तिघांचा मृत्यू झाला. रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याची सुद्धा शक्यता आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे ओळख पटवण्याचे काम सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे.

मृत्यू झालेल्या महिलेमधील एक महिला 40 ते 45 तर दुसरी 25 ते 30 वयोगटातील आहे. दोघींचाही चेहरा छिन्नविच्छिन्न झाला आहे. त्यांच्यासोबत असणारी लहान मुलगी 10 ते 12 वर्षांची असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. रुळावर धडक बसताच लोको पायलटने रेल्वेचा वेग कमी करत काही अंतरावर नेऊन थांबवली. रेल्वे अचानक थांबल्याने परिसरातील नागरिकही रुळाच्या दिशेने आले. यावेळी या तिघींचेही मृतदेह आढळून आले. लोको पायलटने ही माहिती रेल्वेगार्डला दिली. त्याने ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी शाहूपुरी पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक अजय सिंदकर सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !