चाळीसगावातील मृत भिकार्‍याच्या बँकेसह पोस्ट खात्यात तब्बल 12 लाखांची रक्कम


चाळीसगाव : भिकारी अन् तोही चक्क लखपती… ऐकून आश्‍चर्य वाटले असले मात्र ही गोष्ट खरी असून चाळीसगावातील भिकार्‍याच्या मृत्यूनंतरही ही बाब उघड झाल्याने सार्‍यांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. रेल्वेत स्वच्छता करून भीक मागून उदरनिर्वाह करणार्‍या चाळीसगाव येथील रहिवासी इंदलसिंग फुलचंद ठाकूर यांचा 29 फेब्रुवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या घराच्या तपासणीत पोलिसांना आढळलेल्या बँकेच्या पासबुकसह पोस्ट खात्यातील आरडी खात्यात चक्क 12 लाखांची रोकड असल्याचे कळताच पोलिसांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. मयत ठाकूर यांच्या औरंगाबाद येथील नातेवाईकांची माहिती मिळवण्यात चाळीसगाव पोलिसांना यश आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !