मण्यारखेडा तलावातील माशांचा मृत्यू : लाखो रुपयांचे नुकसान


Death of fish in Manyarkheda Lake : Loss of lakhs of rupees जळगाव : मण्यारखेडा तलावात सर्व मासे मृत आढळल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. शनिवारी तलावावर मासेमारी करण्यासाठी मच्छीमार आल्यावर तलावाच्या काठावर सर्व मासे मृत आढळले. या प्रकारामुळे मासेमाराी करणार्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

विषारी पाण्यामुळे मृत्यूचा संशय ?
जळगावातील मन्यारखेडा येथे तलावात आदिवासी मच्छीमार, सहकारी संस्थामधील सदस्य या तलवावर मासेमारी करतात. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी मण्यारखेड तलावावर आले असता तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळले. तलावापासून काही किलोमीटर अंतरावर एमआयडीसी असून या एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांचा विषारी पाणी हे तलावात सोडलं जात असल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. दूषित पाणी अन्यथ सोडण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !