मोक्काच्या आरोपीवर प्राणघातक हल्ला : येरवडा कारागृहातील घटना


पुणे : मोक्काच्या गुन्ह्यात कारवाई करण्यात आल्यानंतर संशयीताला येरवडा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले मात्र तेथेच त्याच्यावर अन्य आरोपींनी हल्ला केला. या घटनेत योगेश जगदीश सोनवणे जखमी झाला असून त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

असे आहे प्रकरण
आरोपी योगेश सोनवणे हा हा चोरी आणि मोक्का या खटल्यामध्ये कारागृहात होता. त्याच्या केसमधील जामीन अर्जावर21 जून रोजी रोजी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच चोरीच्या गुन्ह्यातून त्याची सुटका झाली. मोक्का लागल्यामुळे पुन्हा त्याला अटक करण्यात आल्याची माहिती त्याचे वकील सुशांत तायडे यांनी दिली. दरम्यान, आरोपीच्या पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !