भुसावळात दोन गावठी कट्ट्यांसह आरोपी जाळ्यात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ : शहरातील सै.कलीम सै.जावीद (21, मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ) याच्या ताब्यातून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने दोन गावठी कट्टे मंगळवारी दुपारी जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून गावठी कट्टे सापडत असल्याने शहर शस्त्र तस्करीचे जंक्शन तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित करण्यास वाव आहे. 40 हजार रुपये किंमतीचे दोन कट्टे जप्त केल्याप्रकरणी याबाबत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शरीफोद्दीन काझी, नाईक शेख युनूस शेख रसुल, महेश आत्माराम महाजन आदींनी केली.




