रेवती खून खटल्यातील सहा आरोपींना जन्मठेप


न्यायालयाने शिक्षा सुनावताच आरोपींना कोसळले अश्रू

भुसावळ : बोदवड तालुक्यातील रेवती येथील एकास किरकोळ कारणावरून मारहाण केल्याने याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होवून भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाम चालले. यातील सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व दंड सुनावताच आरोपींना न्यायालयातच अश्रू कोसळले. निकालानंतर आरोपींना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या खटल्यातील दोन संशयीत अल्पवयीन असून अन्य तीन संशयीत आरोपी पोलिसांना अद्यापही सापडलेले नाहीत.

सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
बोदवड तालुक्यातील रेवती येथील दीपक सुदाम पारधे यांचा 19 ऑक्टोबर 2007 मध्ये 11 जणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी बुधवारी अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी.भन्साली यांनी यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यात मृत दीपक याचा भाऊ विजय पारधी, वडील सुदाम पारधी यांच्यासह तपासाधिकारी पी.बी. जाधव, जी.एस. मोरे, डॉ. गिरीष पाटील यांच्या साक्षी महत्वपूणॅ ठरल्यात. न्या.भन्साली यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आरोपी सुपूडू अर्जुन भील (36), गोपीनाथ बुधा भील (38), दीपक छगन भील (37), धु्रपदाबाई अर्जुन भील (56), मैनाबाई गोपीनाथ भील (35), सुनील रामू भील (29) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तसेच 30 हजार 600 रुपयांचा दंड सुनावण्यात आला. सरकारतर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी काम पाहिले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !