मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना : सेतू केंद्रांनी पैसे घेतल्यास परवाना होणार रद्द !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती : पाच एकर जमिनीची अट रद्द


मुंबई ः मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात लागू करण्यात आल्यानंतर राज्यभरात दलालांचा सुळसुळाट वाढल्याची तक्रारी होत्या. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की,
एकाही महिलेने एजंटच्या नादी लागू नये. एजंट येत असेल तर त्याची तक्रार करा, अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचार्‍यांने गडबड करण्याचा प्रयत्न केला. त्याला निलंबित करण्यात आले. इतकेच नाही तर सेतू केंद्र आणि अंगणवाडी सेविकांनी या योजनेमध्ये मदत करावी यासाठी त्यांना देखील प्रति अर्ज पन्नास रुपये राज्य सरकार देणार असल्याची महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सेतू केंद्र चालक योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पैसे स्वीकारत असल्यास त्याची तक्रार येताच त्या केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.

योजनेत असे झाले बदल
या योजनेमचा आता 21 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. डीच लाख रुपयांपर्यंतच्या आत उत्पन्न असणार्‍या महिलांना या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मिळणार आहेत. यामध्ये पाच एकर जमिनीची अट टाकण्यात आली होती. ती अट देखील आता रद्द करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले.


एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ
या योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ देण्यात येणार आहे. यातील एक विवाहित असेल आणि दुसरी अविवाहित असेल तरी देखील योजनेचा लाभ घेता येईल, असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

60 दिवसांचा कालावधी
एक जुलैपासून ही योजना लागू झाली आहे. योजनेत अर्ज करण्यासाठी साठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. यासाठी दिवसाच्या कालावधीत ज्या महिला अर्ज करतील, त्या महिलांनी एक जुलैला अर्ज केला आहे असे समजून दोन्ही महिन्याचे पेमेंट मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यानंतर ज्या महिला अर्ज करतील, त्यांनी अर्ज केलेल्या दिनांक पासून त्यांना पैसे मिळतील.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !