सावदा येथे पत्रकारांचा योगराज फाउंडेशनर्फे सन्मान


सिंगनूर/सावदा : योगराज फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे सावदा शहरात नुकताच पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्यात सिंगनूरचे तरुण भारत प्रतिनिधी हेमंत चांदवे तसेच खिर्डी येथील सादिक पिंजारी, पुण्य प्रतापचे विनायक जहूरे तसेच ‘लोकमत’चे संकेत पाटील व देशोन्नतीचे शेख इद्रीस व साईमतचे कांतीलाल गाढे यांचा उत्कृष्ठ पत्रकार म्हणून सिने अभिनेता भारत गणेशपुरे व सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्याहस्ते सन्मान चिन्ह, व शाल पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती
सत्कार समारंभास संयोजक विनोद सोनवणे, प्रमोद सोनवणे, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, बाबा मानेकर यासह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांच्या सत्कार करण्यात आला. तांदलवाडीचे पत्रकार संजय मधुकर पाटील, पत्रकार राजीव बोरसे, पत्रकार कमलाकर माळी यांना सन्मान चिन्ह, व शाल पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !