भुसावळातील पाणी गेटजवळ अनोळखीचा मृतदेह आढळला
भुसावळ : शहरातील पाणी गेट जवळील गुजराथी स्वीट मार्टच्या पाठीमागून बाजूस 65 वर्षीय अनोळखीचा मृतदेह गुरुवारी आढळला. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शहर पोलिसांना वयोवृद्ध मयत स्थितीत पडून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेत मृतदेह ट्रामा सेंटरला शवविच्छेदनासाठी हलवला. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. तपास सहाय्यक निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

