भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात
भुसावळ : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेवर आधारी गुरु व शिष्यांचा सजीव देखावा सादर करीत नाटीका सादर केली.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी गुरुवर्य शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गुरु विना ज्ञान नाही, गुरुविना शिक्षा नाही, आपला सर्वात मोठा गुरु म्हणजे आपले आई-वडील हे होय. आई-वडिलांचा सन्मान करा हीच खरी गुरुदक्षिणा आहे. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर, प्रतिभा काकडे, जयश्री मोरेस्कर, गायत्री घिर्णीकर, आरती पाचपांडे, शीतल बुला, माया सोनवणे, किरण तांबेकर सह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

