रावेरातील जुन्या सावदा रोडवर पर्यायी रस्ता करा अन्यथा रास्ता रोको

शेतकरी संघर्ष समितीचा इशारा : प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे इशारा


रावेर : शहरातील जुना सावदा रोडवरील नागझिरी नाल्यावरील नवीन पुलाचे काम सुरू असून नवीन पुलाचे काम चालू असतांना परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता नाही. नागरीकांना सोयीसाठी पर्यायी रस्ता तयार करावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रशासनाला लेखी निवेदन
रावेर येथील जुना सावदा रोडवरील नागझिरी नाल्यावरील नवीन पुलाचे काम सुरू असून नवीन पुलाचे काम सुरू असतांना परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता नाही. कोणत्याही पुलाच्या कामाचे इस्टीमेटमध्ये बायपास रस्त्याची तरतुद असते मात्र नागझिरी नाल्यापार नवीन वसाहती जाण्यासाठी नागरिकांना कोणताही बायपास रस्ता सध्या नाही. संबंधीत विभागातील अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे नवीन वसाहतीतील लोकांना तसेच परिसरातील ग्रामीण भागातील लोक फेर्‍याच्या रस्त्याने ये-जा करावी लागत असून रावेर येथील मुख्य रस्त्यावर ट्रॅफीकही वाढलेली आहे. या नवीन पुलाचे काम सुरू असतांना बायपास रस्ता न काढल्याने शाळेतील विद्यार्थी तसेच शासकीय कार्यालयांमध्ये जाण्या-येण्यासाठी तीन कि.मी.च्या फेर्‍याने यावे लागत आहे. या सर्व त्रासामुळे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे.


तहसीलदार प्रशासनाला निवेदन
नागझिरी नाल्याजवळ पर्यायी रस्ता तत्काळ करावा अन्यथा 26 जुलै रोजी रावेर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदार बी.ए.कापसे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, दिलीप साबळे, पुंडलिक कोंगे, डी.डी.वाणी, महेश तायडे, नितीन चौधरी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !