विधवा महिलांसह ज्येष्ठांचे अनुदान सुरू करा


माजी नगरसेवक दीपक धांडे तहसील प्रशासनाकडे मागणी

भुसावळ : भुसावळ शहरातील अनेक गरजू विधवा महिलांचे संजय गांधी योजनेचे अनुदान तहसील कार्यालयामार्फत बंद करण्यात आल्याने या महिलांवर उपासमारीची वेळ आली असून या अनुदानासह ज्येष्ठांचे अनुदान सुरू करावे, अशी मागणी माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी तहसीलदारांकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.

शासनाने बदलावा निर्णय
मुलगा वर्षांचा झाल्याचे कारण देत तहसील प्रशासनाने शहरातील अनेक महिला लाभार्थींचे संजय गांधी योजनेचे अनुदान बंद केले आहे मात्र या अनुदानावर अनेक महिलांचा उदरनिर्वाह असून ही रक्कम अनेकांच्या आजारपणातही खर्च होते. मुलगा 25 वर्षांचा झाला म्हणजे तो कमावता झाला नसून या वयात उलट मुलांना शिक्षणासाठी पैशांची गरज भासत असल्याने शासनाने या निर्णयात बदल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. विधवा महिलेला मरणोत्तर संजय गांधी योजनेचा लाभ द्यावा तसेच श्रावण बाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांचा सुध्दा वयाचे कारण सांगून लाभ बंद करण्यात आल्याने तो लाभदेखील मिळावा, अशी मागणी करण्यात आली. गरजू विधवा व ज्येष्ठ नागरीकांना न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतची प्रत सामाजिक न्याय मंत्री, पालकमंत्री, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकार्‍यांना देण्यात आली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !