भुसावळातील अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या दुसर्‍या व तिसर्‍या माळ्यासाठी 11 कोटी 15 लाख 66 हजार लाखांची तरतूद


आमदार संजय सावकारे यांची माहिती : ग्रामीण रस्त्यांसह वरणगाव-तळवेल योजनेसाठीदेखील तरतूद

भुसावळ : अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दुसर्‍या व तिसर्‍या माळ्याच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पात 11 कोटी 15 लाख 66 हजार लाखांची तरतूद आली आहे तर वरणगाव- तळवेल उपसा सिंचनासाठी 10 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी समाधानकारक निधीची तरतूद असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर शुक्रवारी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात भुसावळ विधानसभा मतदार संघातील उर्ध्व तापी एक हतनूरसाठी 25 कोटी, उर्ध्व तापी दोन हतनूरसाठी 10 लाख, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेसाठी 10 कोटी, भुसावळातील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या पहिल्या व दुसर्‍या माळ्याच्या बांधकामासाठी एक कोटी 11 लाख 66 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सोबतच भुसावळ तालुक्यातील बहुतांश मागणी केलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण कामांसाठी निधीची तरतुद व मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात ग्रामिण भागातील रस्त्यांची कामे पूर्ण होतील. रस्त्यांच्या कामामुळे ग्रामीण विकासालाही चालना मिळणार आहे. वरणगाव तळवेल परीसर उपसा सिंचन योजनेला 10 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने या योजनेतून रखडलेल्या कामांनाही गती येणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !