जळगावच्या प्रौढाचा भुसावळातील तापी नदीत सापडला मृतदेह
भुसावळ (8 ऑगस्ट 2024) : भुसावळ शहरातील तापी नदीच्या पात्रात पश्चिमेकडील लहान पूलाच्या पुढे निमखाडी या भागात जळगाव येथील माऊली नगरातील रहिवासी संतोष बंडू सपके (45) यांचा मृतदेह बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सापडला.
बुधवारी तापी नदीच्या परिसरात गुरे चारण्यास गेलेल्या गुराख्याला तापीनदी पात्रात मृतदेह दिसल्यानंतर त्याने शहर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड, सहायक फौजदार संजय पाटील, मेहूल शाह यांनी घटनास्थळी जात अन्य नागरिकांच्या सहकार्याने तापी नदीतून मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात हलवला. सोशल मिडीयात मयताचा फोटो टाकून ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रकरणी सईद कालू गवळी (रा.जुना सतारा, मामाजी टॉकीजजवळ, भुसावळ) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार अनिल सुरवाडे पुढील तपास करीत आहे.

