कुसूंब्यात घरफोडी : 53 हजारांचा मुद्देमाल चोरीला
जळगाव (9 ऑगस्ट 2024) : जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे चोरट्यांनी बंद घर फोडत 53 हजार 300 रुपयांचा ऐवज लांबवला. हा प्रकार गुरुवार. 8 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता समोर आला. याप्रकरणी रात्री 10 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा
सुरेश जयराम गोयल (60 रा.गणपती नगर, कुसुंबा ता. जळगाव) हे वृद्ध व्यक्ती परिवारासह वास्तव्याला आहेत. 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातून 53 हजार 300 रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी सकाळी 7 वाजता उघडकीस आली. सुरेश गोयल यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर रात्री 10 वाजता एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर करीत आहे.

