मध्य रेल्वेचे जीएम आर.के. यादव यांनी भुसावळात घेतला विकासकामांचा आढावा
Central Railway GM R.K. Yadav reviewed the development works in Bhusawal भुसावळ (9 ऑगस्ट 2024) : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के. यादव हे शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी भुसावळ विभागाच्या दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी भुसावळ रेल्वे स्थानकाची पाहणी करीत विविध सुरू असलेल्या कामांची पाहणी करीत आढावा घेतला. महाव्यवस्थापकांच्या हस्ते विभागीय रेल्वे हॉस्पिटलमध्ये नवीन बनविण्यात आलेले अधिकारी वॉर्ड आणि हिंदी वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. रेल्वे हॉस्पिटल परिसरात त्यांच्याहस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
संरक्षा सेमिनारचे आयोजन
महाव्यवस्थापकांनी कार्मिक विभागाद्वारे वैकल्पिक नियुक्ती संबंधी अॅप लाँच केले. भुसावळ शहरातील कृष्णचंद्र सभागृहात संरक्षा सेमिनारचे आयोजन संरक्षा विभागाद्वारे करण्यात आले. उद्घाटन महाव्यवस्थापकांनी केले. विविध विभागातील डेपो मधून कर्मचार्यांनी समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने योग्य आणि अयोग्य पद्धतींविषयी चर्चा आणि उपाय सुचवण्यात आलेत. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आणि आपले काम सावधगिरीने आणि सतर्कतेने करा असा सल्ला देण्यात आला. कामादरम्यान शॉर्टकट पद्धतीचा अवलंब न करणे आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याबाबत कर्मचार्यांना समुपदेशन करण्यात आले.

रेल्वे स्कूलसह कार्मिक विभागाला बक्षीस
रेल्वे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. महाप्रबंधकांनी रेल्वे स्कूल, भुसावळ व कार्मिक विभागाला 25 हजारांचे तर संरक्षा सेमिनारसाठी 25 हजारांचे पारितोषिक घोषित करण्यात आले.
भुसावळ येथील ताप्ती क्लब मध्ये नवीनीकृत बनविण्यात आलेले सभागृहाचे उद्घाटन महाव्यवस्थापकांनी केले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम.के.मीना तसेच सर्व शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




