रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची : चांदूर रेल्वे स्थानकावर पॉवर व ट्रॅफिक ब्लॉक ; सात रेल्वे गाड्या रद्द
रेल्वे प्रवाशांची गैरसोय ः सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
Power and traffic block at Chandur railway station; Seven trains canceled भुसावळ (11 ऑगस्ट 2024) : चांदुर रेल्वे स्थानकावर पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून सात रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नागपूर विभागातील चांदुर रेल्वे स्थानक येथे अप लूप लाईनच्या विस्तार करण्यात येणार असून त्यासाठी पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे.
या मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द
गाडी क्रमांक 11121 भुसावळ-वर्धा मेमू 12 ऑगस्ट रोजी रद्द, 11122 वर्धा -भुसावळ मेमू 13 ऑगस्ट रोजी रद्द, 12119 अमरावती-अजनी एक्सप्रेस 13 ऑगस्ट रोजी रद्द, 12120 अजनी-अमरावती एक्सप्रेस 13 ऑगस्ट रोजी रद्द, 01371 अमरावती-वर्धा मेमू 13 ऑगस्ट रोजी रद्द, 01372 वर्धा-अमरावती मेमू 14 ऑगस्ट रोजी रद्द, 01374 अमरावती-वर्धा मेमू 14 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

