वाघळी स्थानकावर यार्ड रिमोडूलिंग : सात गाड्या उद्या उशिराने धावणार !


Yard remodeling at Waghli station : Seven trains will run late tomorrow !  भुसावळ (11 ऑगस्ट 2024) :  भुसावळ विभागातील वाघळी स्थानकावर मनमाड-जळगाव दरम्यानच्या तिसर्‍या लाईनसाठी यार्ड रिमोडूलिंगसाठी नॉन कार्य इंटरलॉकिंग कामासाठी सोमवार, 12 रोजी ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामामुळे सा गाड्या उशिराने धावणार आहेत.

त्यात 22122 लखनौ-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस एक तास 15 मिनिटे उशिराने धावणार आहे तर 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 40 मिनिटे, 05290 पुणे -मुजफ्फरपुर विशेष एक्स्प्रेस दोन तास उशिराने धावणार आहे. 12171 लोकमान्य टिळक टर्मिनस-हरिद्वार एक्सप्रेस एक तास 45 मिनिटे व 14313 लोकमान्य टिळक टर्मिनस-बरेली एक्सप्रेस 01 तास 30 मिनिटे, 22690 यशवंतपूर -अहमदाबाद एक्सप्रेस व 12534 मुंबई-लखनउ पुष्पक एक्सप्रेस प्रत्येकी एक तास उशिराने धावणार आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !