भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात हिंदी विषय छात्र संमेलन


भुसावळ (11 ऑगस्ट 2024) : भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात हिंदी विषय छात्र संमेलन घेण्यात आले. याप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांनी व्याकरण विषयक विभीन्न घटकांसंदर्भात अध्यापन केले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा, स्टेज डेरिंग करण्याचे सामर्थ्य वाढावे, कोणत्याही विषयावर बोलता यावे आदी घटक लक्षात घेऊन हिंदी छात्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी हिंदी विषय प्रमुख व उपक्रम आयोजन प्रमुख नवीन नेमाडे , हिंदी विषय ज्येष्ठ शिक्षिका पी.एस.पाटील, जी.व्ही.पाटील उपस्थित होते. उपक्रमाचे निरीक्षण ज्येष्ठ शिक्षक एस. पी.पाठक यांनी केले. उपस्थित शिक्षकांच्या हस्ते उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसे वितरित करण्यात आली. प्रथम क्रमांक दीक्षा मनोहर सोनवणे तर द्वितीय श्लोक बाळू हिरे व खुशी तुषार पाटील या दोघांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक हितश्री विजयकुमार वानखेडे व उत्तेजनार्थ क्रमांक दर्शना नानाराव वानखेडेला देण्यात आला. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, पर्यवेक्षक वाय.एन.झोपे, एस.एल.राणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !