भुसावळातील के. नारखेडे विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मतदान जागृती


भुसावळ (11 ऑगस्ट 2024) : महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्यातर्फे महसूल पंधरवाडा निमित्त तहसील कार्यालयाच्या माध्यमातून के.नारखेडे विद्यालयात नुकताच विद्यार्थ्यांसाठी मतदान जागृती कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी नायब तहसीलदार अंगद आसटकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत स्वयंप्रेरणेने मतदान करण्यासाठी फॉर्म भरून मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले.

प्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस.पी.पाठक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना लोकशाही संपन्न आणि समृद्ध करण्यासाठी आणि स्वतःचा मतदान करण्याचा हक्क प्राप्त करण्यासाठी जागरूक नागरिक होण्याचे व स्वतःच्या हक्कांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विद्यालयातील पर्यवेक्षक एस.एल.राणे, उच्च माध्यमिक विभागातील अनिल जटाळे, प्रशांत चौधरी, अविनाश चौधरी, सुहास चौधरी, एन.जे.खाचणे, पी.व्ही.मुळे, वर्षा कुरकुरे, दीपाली महाजन, अर्चना खाचणे इत्यादी शिक्षक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !