भडगाव तालुक्यातील पिचर्डेत लहान भावाची हत्या
भडगाव (12 ऑगस्ट 2024) : भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथे मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. विठ्ठल आनंदा पाटील (50) असे खून झालेल्या भावाचे तर अभिमान आनंदा पाटील असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. भडगाव पोलिसांनी अवघ्या दोन तासात या गुन्ह्याची उकल केली.
मध्यरात्री केली भावाची हत्या
भडगाव तालुक्यातील पिचर्डे विठ्ठल आनंदा पाटील हे रात्री खळ्यातील मोकळया जागेत झोपलेले असताना त्यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील याने आपल्या लहान भावाची हत्या केली. सकाळी मयताचा लहान भाऊ खळ्यात गेल्यावर त्यांना विठ्ठल आनंदा पाटील मृत आढळले व त्यांनी पोलिस पाटलांना ही माहिती दिली. पोलिस पाटील यांनी भडगाव पोलिस स्टेशनला कळवले व त्यानंतर भडगाव पोलिसांचे पथक दाखल झाले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने हत्येची कबुली दिली.




