मंत्री गिरीश महाजन म्हणाले नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा निश्चित नाही !
Minister Girish Mahajan said the death toll in the Nepal bus accident is not certain! जळगाव (23 ऑगस्ट 2024) : भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल भागातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये शुक्रवारी अपघात घडला. या अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला आहे याचा आकडा अजून अधिकृत आलेला नसल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सरकार व प्रशासन दोन्हीही त्या ठिकाणच्या अधिकार्यांशी व नेपाळ येथील दूतावास यांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे उपस्थित होते.
एअर लिप्ट करून उपचार
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, उत्तरप्रदेश गोरखपुर येथून निघालेली बस दुपारी नेपाळच्या मर्स्यांगडी नदीत कोसळली. या बसमध्ये 43 प्रवासी होते. यामध्ये चार अद्याप बेपत्ता आहेत. 39 जणांना रेस्क्यू करण्यात आले असून 12 जणांना नेपाळ गोरमेंट एअरलिफ्ट करीत काठमांडू येथे रुग्णालयात हलवण्यात आले तर नऊ जणांना स्थानिक जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. त्या ठिकाणी 18 जण असे आहे त्यांच्याबद्दल अजूनही स्थानिक प्रशासनाने काही माहिती दिलेली नाही.

मृतांचा आकडा अद्याप निश्चित नाही
मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, आमच्यापर्यंत अजून अधिकृत अशी माहिती आलेली नाही त्यामुळे आम्ही सुद्धा कन्फ्युज आहोत. अधिकारी व दूतावास यांच्यात बोलणे सुरू आहे. स्थानिक सरकारने मृतांचा आकडा अजून काही निश्चित सांगितलेला नाही. त्यामुळे आम्हालाही याबद्दल काहीही सांगता येत नाही. हे सर्व भाविक भुसावळ तालुक्यातील आहेत.




