कोळन्हावीजवळील तापी पुलावर धावत्या स्वीप्ट कारला आग : सावद्यातील तिघे सुदैवाने बचावले
जळगाव (10 जुलै 2026) : जळगावहून यावलला जाणार्या कारला कोळन्हावी येथील तापी नदीच्या पुलावर गुरुवारी आग लागली. बोनटमधून धूर निघत असल्याचे दिसताच चालकाने कार थांबवली. कारमधील सावदा येथील तिघे खाली उतरल्यामुळे अनर्थ टळला.
सुदैवाने बचावले तिघे
सावद्याचे चालक निलेश बेंडाळे मुलगी काव्या (8) व लहान भाऊ पराग (22) यांच्यासह कार (क्रमांक एम.एच.02 बी.आर.0981) ने जळगावहून सावद्याकडे विदगावमार्गे येत असताना गुरुवारी सकाही साडेसहा वाजेच्या सुमास कारच्या बोनटमधून धूर येताच चालकाने कार थांबवली व कारमधील तिघे बाहेर पडताच कारने पेट घेतला. यावेळी निलेश भामरेंनी गुरुवारी सकाळी 6.55 वाजता 101 वर माहिती दिल्यानंतर जळगाव मनपाच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाला व आग विझवण्यात आली मात्र आगीत कार खाक झाली असून,प्राथमिक अंदाजानुसार, इंजीनच्या भागात अचानक पेट्रोल गळती झाल्याने ही आग लागली.

वाहतूक विस्कळीत
आगीनंतर तापी पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली. सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहनचालकांनी आपली वाहने काही अंतरावर थांबवली त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. भर पुलावर घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.