कोरोना : गर्दीत जाणे टाळा, काळजी घ्या, सावध रहा


भुसावळच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांचे आवाहन

भुसावळ : कोरोना व्हायरसला घाबरू नका, काळजी घ्या, सावध राहा व लक्षणे दिसल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात उपचार घ्या, असे आवाहन मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी केले आहे. राज्याचे मुख्य सचिव व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य क्रॉन्फरन्समध्ये नागरीकांसाठी काही सूचना देण्यात आल्या असून त्याचे पालन करण्याचे आवाहनही मुख्याधिकार्‍यांनी केले आहे.

नागरीकांनी ही घ्यावी काळजी
दिवसातून वारंवार साबणाने हात धुवा, शिंकताना व खोकताना नाक-तोंडावर रुमाल धरावा, सर्दी किंवा तापाची लक्षणे असलेल्या लोकांशी संपर्क टाळावा, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळावा, मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून, उकळू खावी, गर्दी जमवणारे कार्यक्रम जसे- सभा, संमेलन, शिबिर, कार्यशाळा, मेळावे, विविध समारंभाच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच जाणे गरजेचे असल्यास स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करावा, दोन व्यक्तीत संवाद साधताना तीन फुटांचे अंतर ठेवावे तसेच हस्तांदोलनाऐवजी नमस्काराला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !