पीएम किसान योजनेसह शेतकरी कर्जमाफी योजना प्राधान्याने राबवा


प्रांताधिकारी अजित थोरबोले : शेतकर्‍यांना शेतसारा भरण्याचे केले आवाहन

रावेर : रावेर महसूल विभागात प्रांताधिकारी अजित थोरबोल यांनी महत्वपूर्ण आढावा बैठक घेत दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना केल्या शिवाय शेतकरी बांधवांची पीएम किसान, शेतकरी कर्जमाफी, योजनेचे काम प्राधान्याने तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या. शेतकर्‍यांनी शेतसारा भरण्याचे आवाहनदेखील करण्यात आले.

यांची बैठकीला उपस्थिती
रावेर तहसील कार्यालयात महसूल विभागाची तलाठी व मंडळ अधिकारी यांचा विविध योजना व वसूली संदर्भात आढावा बैठक प्रांत अजित थोरबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यामध्ये महसूल वसूली शंभर टक्के करणे, अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालणे, शेतकरी बांधवांची पीएम किसान योजना संदर्भात येणार्‍या त्रृटी लवकर दुरुस्त करून त्यांची समस्या सोडवणे, शेतसारा व अकृषिक कराची वसूली कर्जमाफी यासह अनेक महसूलच्या विविध विषयासंदर्भात प्रांतधिकारी अजित थोरबोले यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, सी.एच.पवार आदींसह तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !