अनिल देशमुख म्हणाले, मी हतबल माझ्यावर गुन्ह्यासाठी दबाव : मंत्री गिरीश महाजन


Anil Deshmukh said, I am desperate pressured me to commit crime : Minister Girish Mahajan जळगाव (5 सप्टेंबर 2024) : माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यावेळी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव होता व ही बाब त्यांनीच भेटीवेळी सांगितली, असा दावा जळगावात मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. गिरीश महाजन म्हणाले की, अनिल देशमुख यांनी त्यावेळी जळगावचे एसपी प्रवीण मुंढे यांना धमक्या दिल्या ही वस्तुस्थिती आहे. मी अनिल देशमुख यांना त्यावेळी भेटलो. अनिल देशमुख म्हणाले की मी हतबल आहे. माझ्यावर आमच्या नेत्यांचे दडपण आहे, हे त्यांनीच मला सांगितले. यापुढे देशमुखांनी मला शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला तरच मी काही मदत करू शकेल, असे म्हटल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला.

पुण्यात घटना अन् जळगावात केला दाखल गुन्हा
महाजन म्हणाले की, घटना घडली पुण्याला आणि साडेपाचशे किमी दूर जळगावमध्ये गुन्हा दाखल करायला लावता. त्यावेळी अनिल देशमुख म्हणाले की, एकनाथ खडसे हे वारंवार शरद पवार यांच्याकडे जाऊन बसतात आणि त्यामुळे माझ्यावर दडपण येते, असा आरोप महाजनांनी करत त्यांना माझ्यासमोर बसवून हे खरे आहे की नाही हे त्यांना विचारा असेही म्हटले आहे.


प्रकरण निराधार : अनिल देशमुख
हे प्रकरण निराधार असून जनतेचा कौल लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे हे षड्यंत्र सुरू केले आहे. अशा दबावाला बळी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर दिली आहे. फडणवीसांनी महाराष्ट्रात विकृत मानसिकतेचे राजकारण केले आहे. ते जनतेने पाहावे, असेही ते म्हणाले. याबाबतचे वृत्त ‘दैनिक दिव्य मराठी’ने ऑनलाईन दिले आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !