श्री क्षेत्र मनुदेवी मार्गावरील चाकूहल्ला प्रकरण : त्रिकूटाची कोठडीत रवानगी


Sri Kshetra Manudevi Marg stabbing case : Trikota remanded in custody यावल (6 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील आडगाव जवळील श्री क्षेत्र मनुदेवी रस्त्यावर शनी मंदिरा जवळील गार्डनच्या पुढे दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून चहार्डीच्या 21 वर्षीय तरुणावर तिघांनी चाकूने हल्ला केला होता. या गुन्ह्यातील तिघा संशयीतांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना सुरूवातीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी कोठडी संपल्यावर भुसावळ येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

संशयीतांची कारागृहात रवानगी
सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरावरून शनिवारी दर्शन घेवून प्रशांत किशोर धनगर (21, रा.चहार्डी, ता.चोपडा) हा तरुण घरी जात असताना शनी मंदिरा जवळील फॉरेस्टच्या गार्ड समोर दुचाकीचा धक्का लागल्याने चेतन संभाजी सोनवणे (20, रा.खेडी, ता.जळगाव), खुशाल शत्रुध्न कोळी (21, रा.पंढरपूर नगर, एमआयडीसी जळगाव) व सुरज नाना पाटील (20, रा.कुसुंबाख, ता.जळगाव) या तीन तरुणांनी त्यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ करून मारहाण केली. एकाने धारदार चाकूने प्रशांत धनगर यांच्या पोटावर वार केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली व न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली.

कोठडीची मुदत गुरुवारी संपल्यावर तिघांना भुसावळ येथील न्यायालयात न्या.एस.व्ही.जंगमस्वामी यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार सागर कोळी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !