फैजपूर शहरातील खंडोबा यात्रोत्सव खान्देशचे वैभव


पालकमंत्री गुलाबराव पाटील : श्री खंडोबा महापूजा भंडारा (उधळण) वस्त्र-अस्त्र-शस्त्र अर्पण सोहळा उत्साहात

फैजपूर : ऐतिहासिक, अध्यात्मिक ज्ञान पंढरी म्हणून सुपरीचीत असलेल्या फैजपूर नगरीत गेल्या दोनशे पंधरा वर्षापासून अविरतपणे प्रति जेजुरी श्री खंडोबा महाराज यांचा यात्रोत्सव यज्ञ सुरू आहे. ही यात्रा खान्देशवासीयांनाच नव्हे तर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील भक्त गणांसाठी एक पर्वणीच असते. या यात्रेच्या निमित्ताने परदेशी गेलेले नातेवाईक सुद्धा एकत्र येऊन समाज जागृती व राष्ट्र उभारणीसाठी योगदान देतात, असे गौरवोद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फैजपूर येथे काढले. श्री खंडोबा महाराज देवस्थान, फैजपूरच्या श्री खंडोबा महापुजा भंडारा, (उधळण) वस्त्र-अस्त्र-शस्त्र अर्पण सोहळा व व्याख्यानमाला कार्यक्रमांतर्गत उद्घाटक म्हणून बोलत ते होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी होते. मुख अतिथी म्हणून खासदार रक्षा खडसे, माजी खासदार हरीभाऊ जावळे, पिंपरी-चिंचवड मनपाचे सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, फैजपूर नगराध्यक्षा महानंदा टेकाम (होले), जिल्हा परीषद गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, मधुकर सहकारी साखर कारखाना चेअरमन शरद महाजन, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य भरत महाजन, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, फैजपूर उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, यावल तहसीलदार जितेंद्र कुवर, फैजपूर सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, मध्य रेल्वेचे अभियंता मुन्ना सिंग तोमर व समाजातील मान्यवर उपस्थित होते.




संत-महात्म्यांनीही दिली उपस्थिती
या कार्यक्रमाला संत परंपरेतील श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्रीराम सनई दासजी महाराज (मोठे लक्ष्मीनारायण मंदिर, नाशिक), महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज (सतपंथ मंदिर संस्थान, फैजपूर), श्रद्धेय परमपूज्य गोपाल चैतन्य जी महाराज, परमपूज्य शास्त्री स्वामी भक्ती प्रकाश दासजी (अध्यक्ष श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्था, सावदा), महंत भरतजी महाराज (श्रीराम मंदिर निर्मोही आखाडा कुसुंबा), परमपूज्य स्वरूपानंद स्वामी (श्री पंत मंदिर डोंगरदे), शास्त्री जगत प्रकाशदाजी महाराज (श्री हनुमान मंदिर सुनासावखेडा), श्री कन्हैयादासजी महाराज (श्री राम मंदिर चिनावल), अद्वैतानंद सरस्वती महाराज (कानळदा), महंत महात्यागी एकनाथदाजी महाराज, महंत सुरेशराज शास्त्री (श्री दत्त मंदिर, सावदा), परमपूज्य कृष्ण गिरीजी महाराज (सोमवारगिरीमढि सावदा), परमपूज्य दिगंबर शास्त्री श्री (शनी मंदिर वाघोदा), शकुंतला दीदी (प्रजापिता ब्रह्मकुमारी, सावदा), आदी संत महात्म्य उपस्थित होते.

खासदारांच्या हस्ते वस्त्र अर्पण सोहळा
या विशेष कार्यक्रमाच्या आयोजनाचा मान रवींद्र काशिनाथ वायकोळे राहणार (फैजपूर, ह.मु.मुंबई) व जितेंद्र काशिनाथ वायकोळे यांना मिळाला. या कार्यक्रमाप्रसंगी वस्त्र अर्पण सोहळा खासदार रक्षा खडसे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी त्यांनी संत निवासाची व्यवस्था करून देण्याची घोषणा केली. यासोबत वस्त्र शस्त्र अर्पण सोहळा माजी खासदार हरीभाऊ जावळे यांच्याहस्ते पार पडला तर वस्त्र अर्पण सोहळा नामदेवराव भाऊ ढाके यांच्याहस्ते पार पडला. श्री खंडोबा महाराज महापूजा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडली. अध्यक्षस्थानी आमदार शिरीष मधुकर चौधरी होते. प्रास्ताविक श्री श्री 1008 महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास जी महाराज यांनी केले. खान्देशचे वैभव असलेले श्री खंडोबा महाराज देवस्थान प्रति जेजुरी म्हणून विकसित व्हावे व या माध्यमातून परीसराचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत सर्वांना अभिवचन दिले. यावेळी प.पू.स्वामी भक्ती प्रकाशदाजी यांनी आयोजनाचे कौतुक करीत फैजपूरला लाभलेल्या वैभव शाली यात्रोत्सव परंपरेला अधिकाधिक महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

खंडोबावाडी देवस्थान विकासासाठी 25 लाखांची घोषणा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या बालपणाच्या आठवणी सांगत त्यांचे मामा स्वतः महामंडलेश्वर असल्याचे सांगून फैजपूररच्या खंडोबा वाडी देवस्थानला 25 लाखांचा विकास निधी जाहीर करून देशात या देवस्थानाला नावारुपाला आणण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी हरीभाऊ जावळे यांनी समाज व देशाच्या विकासासाठी सर्व स्तरातील सर्वधर्मीय व सर्व-पंथीय लोकांनी एकत्र येऊन विकासाला हातभार लावावा आणि याची सुरुवात या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असल्याचा आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिरीष मधुकर चौधरी यांनी श्री खंडोबावाडी देवस्थान अतिप्राचीन व असंख्य लोकांचे श्रद्धास्थान असल्याने या देवस्थानाच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी तर अनमोल सहकार्य समस्त भक्तगण, श्री खंडोबा वाडी संस्थान फैजपूर यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !