यावल शहरात अतुल पाटील मित्र परिवाराच्या वतीने शिक्षकांचा सन्मान
यावल (8 सप्टेंबर 2024) : यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या अतुल पाटील मित्र परिवाराच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात यावल येथील शिक्षक सुधीर चौधरी यांचादेखील पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. शहरातील प.पु.साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.झाकीर हुसैन उर्दू हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य आर.क्यू.शेख होते.
यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, वसंत पाटील, अय्युब खान, पी.एस.सोनवणे, गोपाळसिंग पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य सांरगधर अडकमोल, प.पू..साने गुरुजी विद्यालयाचे प्राचार्य एम.के.पाटील, माजी उपनगराध्यक्ष असलम खान, आदिवासी आश्नमशाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम.बी.तडवी, पी.एस.बडगुजर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक गुरूवर्य व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय नन्नवरे यांनी तर उपस्थितांचे आभार डी.के.फेगडे यांनी मानले.

सुधीर चौधरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
शिक्षक व पत्रकार असलेले सुधीर चौधरी यांना सन्मान करण्यात आल्याने पत्रकार अय्युब पटेल, पत्रकार अरुण पाटील, शेखर पटेल, पत्रकार डी.बी.पाटील, सुनील गावडे, पत्रकार महेश पाटील, सुरेश पाटील, जीवन चौधरी, पत्रकार तेजस यावलकर, फिरोज तडवी, नितीन झांबरे, विक्की वानखेडे, दीपक नेवे यांच्यासह आदी पत्रकारांनी त्यांचे स्वागत केले आहे.
