भुसावळातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात विद्यार्थिनींनी चालवली शाळा
भुसावळ (8 सप्टेंबर 2024) : श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवसभर शाळा चालवली. संस्थाध्यक्ष सोनू मांडे यांच्याहस्ते विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या ‘हस्तकला प्रदर्शनाचे’ उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी चालवली शाळा
शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक संजीव पाटील यांच्याहस्ते भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नववीत प्रथम आलेली पूर्वा चौधरीने मुख्याध्यापक तर द्वितीय आलेल्या तनुश्री भोळे आणि कुमारी पूर्वजा काळे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम सांभाळले. मधल्या सुट्टीमध्ये शाळेतील विद्यार्थिनींच्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले. विद्यार्थ्यांनी दिवसभरातील कामकाजाचे आलेले अनुभव कथन केले. यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

