दिवाळी, छटपूजेसाठी पुणे, मुंबईसाठी पाच विशेष रेल्वे गाड्या धावणार
भुसावळ (9 सप्टेंबर 2024) : मध्य रेल्वे दिवाळी आणि छट पूजेच्या सणांसाठी उत्सव विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मोठ्या मागणीचा आणि सणाच्या काळातील अतिरिक्त गर्दीचा विचार करून दिवाळी आणि छट पूजेच्या सणांसाठी उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या सहा फेर्या होणार आहे. 01209 विशेष गाडी ही 26 ऑक्टोबर आणि 9 नोव्हेंबर रोजी प्रत्येक शनिवारी नागपूर येथून संध्याकाळी 7.40 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 11.20 वाजता पुणे येथे पोहोचेल. 01210 विशेष गाडी 27 ऑक्टोबर आणि 10 नोव्हेंबर रोजी प्रत्येक रविवारी पुणे येथून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी उरली, दौंड कॉर्डलाईन, नगर, बेलापूर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामणगांव आणि वर्धा येथे थांबणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-नागपूर विशेष गाडीच्या चार फेर्या होतील. 02139 विशेष गाडी 31 ऑक्टोबर आणि 7 नोव्हेंबरला लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून रात्री 12.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता नागपूरला पोहोचणार आहे. 02140 विशेष गाडी 1 व 8 नोव्हेंबर रोजी नागपूरहून दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी पहाटे 4.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचणार आहे. ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, वर्धा येथे थांबेल.

मुंबई-आगरतळा साप्ताहिक गाडी
मुंबई-आगरतळा साप्ताहिक विशेष गाडीच्या चार फेर्या होतील. 01065 विशेष गाडी 31 ऑक्टोबर आणि 7 नोव्हेंबरला मुंबई येथून सकाळी 11.5 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी 1.10 वाजता आगरतळा येथे पोहोचेल. 01066 विशेष गाडी 3 व 10 नोव्हेंबरला आगरतळा येथून दुपारी 3.10 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी सकाळी 3.50 वाजता मुंबई येथे पोहोचेल. ही गाडी भुसावळ विभागातील नाशिक, भुसावळ, खंडवा येथे थांबणार आहे. प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशसानाने केले आहे.
पुण्यासाठी विशेष गाड्या
पुणे-दानापूर या विशेष गाडीच्या 28 फेर्या होतील. यात 01205 विशेष गाडी 25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत प्रतिदिन पुणे येथून दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी पहाटे दोन वाजता दानापूरला पोहोचणार आहे. 01206 विशेष गाडी 27 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत रोज दानापुरहून सकाळी 5.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी 6.15 वाजता पुण्यात पोचेल. ही गाडी दौंड कॉर्डलाईन, नगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा येथे थांबेल. पुणे-गोरखपूर विशेष गाडीच्या 42 फेर्या होतील. 01415 विशेष गाडी दि. 22 ऑक्टोबर ते 11 नोव्हेबरपर्यंत रोज पुणे येथून सकाळी 6.50 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी 4 वाजता गोरखपूरला पोचेल. 01416 विशेष गाडी दि. 23 ऑक्टोबर ते 12 नोव्हेबरपर्यंत रोज गोरखपूरहून संध्याकाळी 5.30 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी सकाळी 3.15 वाजता पुणे येथे पोहोचेल. ही गाडी दौड़ कॉर्ड लाइन, नगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, कानपूर, लखनऊ, गोंडा आणि बस्ती येथे थांबणार आहे.
