भुसावळात निळे निशाण संघटनेत अनेकांचा प्रवेश


भुसावळ (9 सप्टेंबर 2024) : शहरात निळे निशाण संघटनेची तालुका कार्यकारणीची बैठक शहरात झाली. या बैठकीत अ‍ॅड.प्रवीण इंगळे यांच्यासह अनेकांनी संघटनेत प्रवेश केला. रविवार, 8 रोजी शासकिय विश्रामगृहावर भुसावळ तालुका कार्यकारणीची बैठक झाली. संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हाध्यक्षा नंदा भावटे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

यांची बैठकीला उपस्थिती
संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अ‍ॅड.प्रवीण इंगळे तसेच असंख्य महिला वर्ग व तरुण वर्गाने संघटनेत प्रवेश केला. यशस्वीतेसाठी भुसावळ तालुकाध्यक्षा निकिता भावटे, तालुका उपाध्यक्षा मनिषा लोखंडे, तालुका संपर्क प्रमुख मंदा सावळे यांनी परिश्रम घेतले. बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष सदाशीव निकम, प्रा.प्रकाश मोरे, महेंद्र महाले, सुकदेव सोनवणे, माया शंभरकर, बारसके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !