इनरव्हील क्लब ऑफ भुसावल रेल सिटीतर्फे शिक्षक दिन


भुसावळ (9 सप्टेंबर 2024) : भुसावळ शहरातील भगीरथी प्राथमिक विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक म्हणून साजरा करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
इनरव्हील क्लब भुसावळ रेल्वे सिटीतर्फे शाळेतील मुख्याध्यापक अजय प्रकाश फेगडे, शिक्षक रामकृष्ण इतवारे, भावना पाटील, सुनीता वानखेडे, जयमाला भोळे, कावेरी चौधरी यांचा 5 रोजी शिक्षक दिनानिमित्त शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रथमच भगीरथी विद्यामंदिरात शिक्षक दिन साजरा झाल्याचे शिक्षकांनी मनोगतात सांगितले. प्रसंगी इनरव्हील अध्यक्षा मीनाक्षी धांडे, सचिव किरण जावळे, सदस्या अनिता महाजन, जयश्री चौधरी, मेघा वाणी उपस्थित होत्या. अध्यक्षा मीनाक्षी धांडे यांनी शिक्षक दिनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !