श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात आर्थिक दुर्बल सहाय्य योजनेचे मानधन वाटप
मुक्ताईगनर (9 सप्टेंबर 2024) : मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी आर्थिक दुर्बल सहाय्य योजनेचे मानधन वाटप करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने चालवल्या जाणार्या या योजनेत महाविद्यालयाचे एकूण 13 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 13 विद्यार्थ्यांना मानधन स्वरूपामध्ये एकूण 83 हजारांची रक्कम देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.ए.महाजन, उपप्राचार्य डॉ.ए.पी.पाटील यांची उपस्थिती होती. ही योजना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येते. प्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजीव साळवे त्याचप्रमाणे सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.अतुल बढे व महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.सविता जावळे यांची उपस्थिती होती.

