यावल शहरातील विविध मंदिरांमध्ये गुरुवारपासून श्रीमद् भागवत सप्ताह
यावल (11 सप्टेंबर 2024) : सालाबादाप्रमाणे यंदा सुद्धा शहरातील विविध मंदिरांमध्ये श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन 12 ते 18 सप्टेंबर या काळात आयोजित करण्यात आले. शहरातील विविध मंदिरांमध्ये श्रीमद् भागवत कथा सप्ताह होणार आहे.
भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन
शहरातील दत्त मंदिरामध्ये श्यामशास्त्री नाईक, राम मंदिरामध्ये अतुल महाराज बाविशे, देवीच्या मंदिरामध्ये विनोद महाराज बयाणी, महाजन गल्लीमधील विठ्ठल मंदिरामध्ये मोरेश्वर बयाणी तर श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये श्रीकांत सराफ हे श्रीमद भागवताचे वाचन व निरुपण करणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळात संस्कृत वाचन तर दुपारी 2.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मराठीमध्ये अनुवाद सांगणार आहे. बुधवारी श्री लक्ष्मीनारायण मंदिरात दुपारी तीन वाजता गोकर्ण वाचन होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.

