भुसावळातील नाहाटा चौफुली ते बाजारपेठ पोलिस ठाण्याचा मार्ग चकाचक


भुसावळ (11 सप्टेंबर 2024) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या सूचनेवरून ठेकेदाराने सोमवारी दुपारी नाहाटा चौफुली ते बाजारपेठ पोलिस ठाण्यापर्यंतचा रस्ता 150 सफाई कर्मचारी यांनी चकाचक केला. गणेशोत्सवाच्या काळात याच पध्दतीने सफाई होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात पालिकेतील 150 सफाई कर्मचार्‍यांनी शहरातील मुख्य रस्ते, गणपती मंदिराचा परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना मुख्याधिकारी राजेद्र फातले यांनी दिल्या. ठेकेदाराने शहरातील नाहाटा कॉलेज ते बाजारपेठ पोलिस ठाण्यापर्यंतचा चकाचक केला

गणेशोत्सव काळात नियमित होणार सफाई
मातृभूमी गणेश मंडळ, शिवमुद्रा प्रतिष्ठान गणेश मंडळ आदी भाग स्वच्छ केला. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध भागात जाऊन सफाई कर्मचारी स्वच्छता करणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दुपारी शहरातील जामनेर रोडवर मोठ्या प्रमाणावर सफाई कर्मचारी रस्ते स्वच्छ करतांना दिसत होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !