रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची : गाळण स्थानकावर रेल्वेचा ब्लॉक ; 12 रेल्वे गाड्या रद्द


Railway block at Galan station : 12 trains cancelled भुसावळ (11 सप्टेंबर 2024) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी-भुसावळ खंड दरम्यान गाळण स्थानकावर अप व डाउन लूप लाईन्सचा विस्तार करण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी विशेष ब्लॉक शुक्रवार, 13 पासून घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणार्‍या 12 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. भुसावळ विभागातील गाळण रेल्वे स्थानकावर रेल्वेने ब्लॉक घेतल्याने त्याचा परिणाम रेल्वे गाड्यांवर झाला असून 12 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. एक्स्प्रेस व मेल गाड्या रद्द करण्यात आल्या.

या रेल्वेगाड्या रद्द
शुक्रवार, 13 सप्टेंबर रोजी नागपूर-पुणे एक्स्प्रेस रद्द, 14 रोजी पुणे-नागपूर एक्स्प्रेस रद्द, 13 व 14 रोजी अमरावती-पुणे एक्स्प्रेस, पुणे-अमरावती एक्स्प्रेस, ईगतपुरी-भुसावळ मेमू, भुसावळ-ईगतपुरी मेमू, देवळाली-भुसावळ मेमू, भुसावळ-देवळाली मेमू, बडनेरा-नाशिक विशेष गाडी, नाशिक-बडनेरा विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे. रेवा-मुंबई विशेष गाडी गुरुवार, 12 सप्टेंबरला रोजी तर मुंबई-रेवा विशेष गाडी शुक्रवार, 13 सप्टेंबरला रोजी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी या ब्लॉकची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !