भुसावळात 24 हजार भाविकांना महाप्रसादाचे वितरण

साईजीवन सुपर शॉपचे संचालक निर्मल कोठारी यांचा उपक्रम : आमदारांनी बजावली सेवा


भुसावळ (19 सप्टेंबर 2024) : शहरातील माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी अनंत चतुर्दशीला यावल रोडवरील साईजीवन सुपर शॉपसमोर 24 हजार भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले. 1350 किलो तांदळाचा मसाले भात, 700 किलो गव्हाच्या पुर्‍या, 400 किलो दह्याची कढी, 25 हजार केळींचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात काही मुस्लिम बांधवांनी स्वयंस्फूर्तीने सेवा दिली. आमदार संजय सावकारे यांनी स्वत: प्रसाद वाटप केले.

दरवर्षी अन्नदानाचा उपक्रम
गणेश विसर्जन मिरवणुकीत माजी नगरसेवक कोठारी दरवर्षी अन्नदान करतात. त्यानुसार यंदा सुद्धा यावल रोडवर व्यवस्था केली होती. दुपारी 1 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात आले. या महाभंडार्‍यात तब्बल 24 हजार भाविकांना 150 क्रेट केळी, 350 किलो तांदळाचा मसाले भात, 700 किलो गव्हाच्या पिठाच्या पुर्‍या, 400 किलो दह्याची गरमागरम ताकाची कढी आदींचे वितरण करण्यात आले. आमदार संजय सावकारे यांनी दीड तास प्रसाद वाटपाची सेवा दिली. माजी नगरसेवक मनोज बियाणी, राजू पारीख, माजी नगरसेवक निर्मल कोठारी मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

10 टन निर्माल्य संकलन
यावल रोडवर महाप्रसाद वाटप स्थळासमोरच निर्माल्य संकलनाची सुविधा होती. याठिकाणी 10 टन निर्माल्य संकलन करुन त्याची विधीवत विल्हेवाट लावण्यात आली. यामुळे तापी नदीचे होणारे प्रदूषण थांबण्यास मदत झाली.

 


कॉपी करू नका.