भुसावळातील जनता गॅलरीप्रमाणेच एस.एस.मोबाईलही ग्राहकांच्या पसंतीस उतरणार ! : आमदार संजय सावकारे
भुसावळ शहरात एस.एस.मोबाईल गॅलरीचा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात शुभारंभ : पहिल्याच दिवशी ग्राहकांची उसळली गर्दी
भुसावळ (23 सप्टेंबर 2024) : भारतातील पाचव्या क्रमांकाची व महाराष्ट्राची पहिल्या क्रमांकावर असलेली एस.एस.मोबाईल कंपनी देखील भुसावळकरांच्या विश्वासास निश्चित उतरेल, असा विश्वास भुसावळचे लाडके आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केला. शहरातील जनता गॅलरीला लागून असलेल्या एस.एस.मोबाईल गॅलरीचा शुभारंभ रविवार, 15 रोजी आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. आमदार म्हणाले की, भुसावळकरांचा विश्वास शहरातील जनता गॅलरीने 50 वर्षांपासून टिकवून ठेवला आहे व हाच विश्वास यापुढेदेखील कायम राहणार आहे. शहरवासीयांसाठी एस.एस.मोबाईल हे निश्चितच विश्वासपात्र दालन ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मान्यवरांनी दिल्या भेटी
उद्घाटनप्रसंगी आमदार संजय सावकारे, माजी आमदार संतोष चौधरी, माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगरसेवक हाजी मुन्ना तेली, जनता सायकलचे संचालक केसरसिंग छाबडा, कृउबाचे माजी सभापती सचिन चौधरी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक नागराणी, गुड्डू अग्रवाल, माजी नगरसेवक अजय नागराणी, गौरव आवटे, ब्रोकर्स तानाजी पाटील, अॅड.भगवती गामोट, कर सल्लागार राजेश शर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष तसेच फोनवरून व सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यावेळी एस.एस.मोबाईल नाशिक विभागाचे प्रमुख केवल अहिरे, जळगाव विभागाचे श्रीराम जहांगीरदार यांची विशेष उपस्थिती होती. भुसावळातील जनता गॅलरीचे संचालक गुरूदीपसिंग (टिटू सेठ) छाबडा व पवनीतसिंग छाबडा यांनी मान्यवरांचे स्वागत केले.


ग्राहकांची उसळली गर्दी
एस.एस.मोबाईल गॅलरीच्या शुभारंभाला एका मोबाईल खरेदीवर असलेल्या चार ऑफरमुळे शहरातील ग्राहकांची तोबा गर्दी झाली होती. अवघ्या काही तासात स्टॉकची विक्री झाल्याचे संचालक पवनीतसिंग छाबडा यांनी सांगितले. ग्राहकांच्या प्रेमाने आम्ही भारावलो असून ग्राहकांना सेवा देण्यासाठी कटीबद्ध आहोत शिवाय शहरातील ग्राहकांनी एकवेळ अवश्य गॅलरीला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
एकाच दालनात मिळेल सर्व काही
शहरातील स्टेशन रोडवरील जनता गॅलरीला लागून एस.एस.मोबाईल गॅलरी उघडण्यात आली आहे. या गॅलरीत आपल्याला अॅपल कंपनीचे नामांकीत फोन्स तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल आपणास आकर्षक किंमतीत मिळतील शिवाय जनता गॅलरीत विविध नामांकीत कंपनीचे टीव्ही, फ्रीज, एस.सी. तसेच साऊंड बार माफक किंमतीत उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी मोबाईल 8956138461 वर संपर्क साधण्याचे आयोजक कळवतात.
भारतातील सर्वात मोठी कंपनी
एस.एस.मोबाईल ही भारतातील पाचवी सर्वात मोठी मोबाइल रिटेल कंपनी असून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधील एक प्रमुख ब्रँड आहे. जो त्याच्या स्मार्टफोन्स, अॅक्सेसरीज आणि स्मार्ट टीव्हीच्या विस्तृत श्रेणीसाठी आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी ओळखला जातो.




