जळगावात मृत अर्भकाला टाकून माता पसार
जुने जळगाव परिसरातील घटना शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
जळगाव (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकरनगर भागात मंगळवारी पहाटेच्या सुमारास रस्त्यावर पुरुष जातीच्या अर्भकाला सोडून माता पसार झाल्याचा प्रकार समोर आला. रक्ताने माखलेल्या अवस्थेत हे अर्भक आढळल्याने स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल.
फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकरनगर या दाट लोकवस्तीच्या भागातील एका गल्लीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास नागरिकांना रस्त्यावर रक्ताने माखलेले मृत अर्भक दिसून आले. हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने शनीपेठ पोलिसांना माहिती दिली.



घटनेचे गांभीर्य ओळखून शनीपेठ पोलीस ठाण्याचे पथक आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले असून रीतसर पंचनामा करण्यात आला आहे. अज्ञात मातेने बाळाच्या जन्मानंतर अर्भक सोडून दिले असल्याचा संशय आहे.