खेळ हा विद्यार्थी जीवनातील एक अविभाज्य भाग : आमदार एकनाथराव खडसे


मुक्ताईनगर (23 सप्टेंबर 2024) : शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळाचे खूप महत्त्व आहे. निकोप शरीरातच निकोप मन असते. खेळामुळे शरीर व मन दोघे स्वस्थ राहून मन व बुद्धी यांचा विकास होतो. खेळामुळे मनोरंजन होतेच शिवाय मनाची एकाग्रता साधता येते त्यामुळे खेळ हा विद्यार्थी जीवनातील एक महत्त्वाचा व अविभाज्य भाग असल्याचे मत एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. नवीन माध्यमिक विद्यालय, निमखेडी खुर्द येथे शालेय क्रीडा विभाग व शिक्षण विभाग पंचायत समिती, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत
आमदार खडसे म्हणाले की, निरोगी शरीरासाठी नियमित व्यायामासोबत खेळ खेळणे आवश्यक आहे. खेळांमुळे शिस्त, परिश्रम, संघ भावना, नेतृत्व यासारखे गुण विकसीत होऊन यशस्वी जीवनाचा पाया रोवला जातो म्हणूनच जीवनात क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक प्राविण्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत


यांची होती उपस्थिती
यावेळी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्याहस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष नारायणराव चौधरी, संस्थेचे सचिव डॉ.सी.एस.चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश राणे, संस्थेचे संचालक चंद्रशेखर बढे, रमेश खाचणे, आर.पी.बर्‍हाटे, महेश पाटील, योगेश पाटील, प्रदीप साळुंखे, तालुका क्रीडा मार्गदर्शक जगदीश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी संजय ठोसर, केंद्रप्रमुख धनलाल भोई, योगेश भोसले, महेंद्र मालवेकर, तालुका क्रीडा कार्यालयाचे कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक विकास चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

स्पर्धेत 18 शाळांनी सहभाग नोंदवला. यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा शिक्षकांनी तसेच भोजन व्यवस्थेसाठी बी.के.महाजन, अशोक जाधव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक ए.एन.चव्हाण यांनी केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !