भुसावळातील भोळे महविद्यालयातर्फे स्वच्छता संस्कार कार्यक्रम


भुसावळ (24 सप्टेंबर 2024) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटमार्फत स्वच्छता ही सेवा 2024 स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अंतर्गत 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2024 अभियान राबविण्यात येत आहे.

भुसावळ कृषी उत्पन्न समितीतील परिसराची स्वच्छता करण्यात आली. कागद, प्लास्टिक, पाला-पाचोळा, खाली पडलेल्या भाज्या झाडून जमा करण्यात आल्या व कचरा नगरपालिकेच्या घंटागाडीत टाकण्यात आला. स्वच्छता अभियानात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर पी फालक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, डॉ.एम.ए.पाटील, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.एस.व्ही.बाविस्कर, प्रा.ए.आर.सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.एस.एस.पाटील व 115 विद्यार्थी सहभागी झाल्याचे प्रसिद्धी प्रमुख डॉ.संजय चौधरी कळवितात.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !