भुसावळ तालुकास्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत साकेगावचे मंडळ प्रथम


भुसावळ (24 सप्टेंबर 2024) : भुसावळ तालुका पोलीस स्टेशनतर्फे गणेशोत्सव 2024 साठी विविध निकषावर आधारीत परीक्षण केल्यानंतर साकेगाव येथील जय श्रीराम नगरचा राजा गणेश मंडळाला प्रथम पारितोषिक देण्यात आले तर खडका येथील न्यू त्रिमूर्ती गणेश मंडळाला द्वितीय व कुर्‍हेपानाचे येथील जय बजरंग गणेश मंडळाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पोलीस उपअधीक्षक कार्यालयात पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते देण्यात आले.

प्रास्ताविक भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी केले.. यावेळी उत्तेजनार्थ पारितोषिक साकेगाव येथील दोस्ती ग्रुप गणेश मंडळ व नवयुवक गणेश मंडळ तसेच वराडसीम येथील अयोध्या नगरीचा राजा मंडळाला देण्यात आले. ‘एक गाव एक गणपती’ चे पारीतोषिक सुनसगाव व भिलमळी गावाला देण्यात आले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !