भगवान महावीर स्वामींच्या 2550 व्या निर्वाण महोत्सवनिमित्त निबंध स्पर्धा

कल्याणक महोत्सव समितीतर्फे राज्यस्तरावर आयोजन


Essay Competition on the occasion of 2550th Nirvana Festival of Lord Mahavir Swamy भुसावळ (25 सप्टेंबर 2024) : राज्यातील 36 जिल्ह्यातील सुमारे एक लाख सरकारी, निमशासकीय व खाजगी शाळांमधील जवळपास दीड कोटी विद्यार्थ्यांसाठी भगवान महावीर स्वामीजींच्या जीवनावर आधारित निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान महावीर स्वामी निर्वाण कल्याणक महोत्सव समिती महाराष्ट्र शासनातर्फे या स्पर्धा होणार आहेत.

दोन गटात स्पर्धा
इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे दोन गट करून विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी, हिंदी किंवा गुजराती भाषेत दोन पानांमध्ये अंदाजे 500 शब्दांत, चांगल्या हस्ताक्षरात निबंध लिहीण्यासाठी आवाहन करण्यात आलेआहे. राज्यातील सर्व शाळांना हे निबंध स्पर्धा आयोजित करणे असल्याचे पत्र मंत्रालय व जिल्हाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाले आहे. निबंधाच्या शेवटी संपूर्ण पत्त्यासह विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, वय, मुख्याध्यापकांचे नाव, मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक, शाळेचे नाव, शाळेचा ईमेल आयडी, शहर, गाव, तालुका, जिल्हा अशी स्पष्ट माहिती देणे बंधनकारक आहे. 30 सप्टेंबर पर्यंत सदरील निबंध स्पर्धेची मुदत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या जिल्हा महोत्सव समितीचे अजय ललवाणी, चेतन जैन- हेमावत, संजय जैन, महेंद्र जैन, विकी पिपरिया व सकल जैन समाजाने केले आहे.

दोन गटात होणार स्पर्धा
राज्य स्तरावर दोन्ही गटांमधून एक-एक तर एकूण 36 जिल्ह्यामधून दोन्ही गट मधून प्रथम पाच-पाच विद्यार्थिनींना बक्षीसे दिली जातील. तसेच शाळेचे मुख्याध्यापक, जिल्हा समिती, पालक यांचा सन्मान मुंबई येथील कार्यक्रमात ग्लोबल एक्झिम ग्रुप ऑफ कंपनीज मुंबई यांच्या सौजन्याने होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन भुसावळातील पदाधिकारी चेतन जैन यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !